मटका - बुद्धीचा खेळ की नशिबाचा?

matka result written on slate - matka mahiti marathi


सूचना:- "हा लेख सट्टा मटका खेळाची 'माहिती' या उद्देशाने लिहिला आहे. "

Disclaimer:- This article neither teach matka gambling nor predicts any matka guess.


मटका बदनाम कुतुहुल 

मटका पहिल्या पासून खेळणारे आणि न खेळणारे अशा दोन्ही प्रकारच्या लोंकांसाठी चर्चेचा विषय राहिला आहे.एखादया साठी तो कुतुहुल तर दुसऱ्या साठी टीकेचा विषय असतो.काही खेळणाऱ्याला उपदेशाचे डोस देतात,तर काही मटका चालवणाऱ्याला शिव्या -शाप.एखाद्याला हा बुद्धीचा खेळ वाटतो तर एखाद्याला नशिबाचा.हा बेकायदेशीर आणि बदनाम खेळ आहे हे माहीत असूनही हल्ली तरुण वर्गाला नऊ ते दहा पट पैसे देणारा हा खेळ आकर्षित करत आहे.हे त्यांच्या मटका विषयी माहिती जाणून घेण्या बद्दलचे प्रश्न यावरून लक्षात येते.मटक्यात कोण पैसे देतो?मटका बुद्धीचा खेळ की नशिबाचा?यावर किती लोक अवलंबून असतात?मटका कसा काढतात?ह्या प्रकारचे प्रश्न समाज माध्यमातून बघायला मिळतात. ह्या पोस्ट मध्ये आपण याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.


मटका काय आहे ?


जुगारातील अनेक प्रकारां पैकी मटका हा एक लोकप्रिय व नेहमीच वादात असलेला लॉटरी प्रकार आहे.ज्या मध्ये ०० ते ९९ पर्यंत आकडे असतात सिंगल आकड्याला १रुपयाला ९रु.आणि जोडी १रु.ला ९०रुपये असा सर्वसाधारण भाव असतो.यात पत्ते(playing cards) किंवा मटक्यातुन आकड्यांची चिठ्ठी काढून अंक जाहीर करण्यात येतो असे मानले जाते परंतु तसे असते तर त्यांना रेकॉर्डस् ठेवण्याची गरज असती का?असाच यादृच्छिक आकडे देणारा खेळ 'कॉम्प्लॉट'माघून येऊन लुप्त होण्याच्या मार्गावर आहे म्हणजेच मटका हा त्याच्या सांख्यिकीक थेअरीला सोडून चालत नाही असे खेळणाऱ्यानां वाटते.हा आकडेमोड करून आणि येऊन गेलेल्या अंकाचा अभ्यास करून त्यातून आजचा किंवा पुढील तारखांचे अंदाज बांधता येतात,असा खेळणाऱ्यांचा विश्वास आहे.१९६२पूर्वी आकडा खेळ 'अमेरिकन कॉटन'नावाने ओळखला जायचा ज्यामध्ये 'न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंज' चा खुलतीचा आणि बंदचा दरच विजेता अंक असत पुढे न्यूयॉर्क कॉटनने आपल्या धोरणात बदल केल्या मुळे आकडे चालवणाऱ्यांना पर्यायी व्यवस्था उभी करणे गरचेचे होते.कारण तो पर्यंत आकडा खेळ लोकप्रिय झाला होता.अनेक आकडे चालवणाऱ्यांना रोजगार मिळाला होता.मुंबईतील गिरणींच्या चलतीच्या काळात अनेक कामगारांना देखील मटक्यामधून आशा वाटत होती.पुढे रतन खत्री यांनी 'मेन मुंबई' बाजार चालू केला.खत्रीनेच आकड्यांचे एक फॉरमॅट तयार केले जे आजपर्यंत चालू आहे.आजच्या घडीला देशभरात शेकडो सट्टा बाजार चालतात पण त्यातील 'मेन मुंबई' व 'कल्याण' बाजार च लोकांना भरवशाचे वाटतात.

आकडा कसा चालतो ?


हा धंदा साखळी पद्धतीने चालवला जातो ज्यामध्ये ऐजंट (आकडे लिहिणारा)कमिशन किंवा रोजंदारी ने काम करत असतो.तो त्याच्या डायऱ्या पिढीवाल्याला (बुकी)देतो. पिढीवाला जे आकडे येऊ शकतात तेच मोठ्या पिढीवाल्याला किंवा सरळ बाजार मालकाला देतात व उर्वरित आकडे(रक्कम)ठेऊन घेतात.बऱ्याचदा पिढीवाला जास्तच आकडे ठेवायला लागला म्हणजे वरती पैसे देत नसेल याला 'पलटी' न देणे असे म्हणतात.अशा वेळेस बाजार मालक स्वतःची माणसे पाठवून तिथे खेळणाऱ्या लोकांमध्ये 'गेम लीक'करायला सुद्धा कमी करत नाही.हा धंदा चालवणारे त्यांच्या गोपनीयतेची संपूर्ण काळजी घेत असतात त्यांचा अंक घेणे ज्याला 'भाव'म्हणतात फोनवर चालतो.त्यामुळे ते अंक खुला करण्याचा वेळ बदलत चालतात,दिवाळी पर्यंत मूळ वेळेपासून सव्वा तासा पर्यंत वाढवतात.दिवाळी नंतर लवकर दिवस मावळतो आणि बरेच खेळणारे ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांना लवकर घरी जाण्यासाठी वेळ पूर्ववत होतो.

सट्टा मटका बाजार उलाढाल

प्रत्यक्ष मटक्याची रोजची उलाढाल करोडोची असली तरी त्या वितिरिक्त बरेच लोक आहेत जे या संबंधित व्यापारावर अवलंबून असतात.त्यामध्ये प्रिंटिंग प्रेसेस जे मटक्यासाठी लागणारे साहित्य रेकॉर्डस्,गेस पेपर छापतात.मटका प्रोफेसर जे रेकॉर्डस् चा अभ्यास करून पुढील तारखांचे गेस आकडे 'पॉकेट गेम'बनवून विकतात,पेपर विक्रेता जिथे हे साहित्य मिळते.मटक्यात इतकी ताकत नक्कीच आहे की कुठल्याही जाती-धर्माच्या,कुठल्याही वयाच्या लोकांना 'आज काय येणार'या बॅनर खाली एकत्र ठेवतो.तरीही कुठल्याही गोष्टीचा अतिरेक घातकच असतो.आकड्यांचे खेळ पैसे कमावण्याचा शॉर्ट कट जरी वाटत असले पण अधोगतीचे देखील आहे.

मटका कसा खेळला जातो आणि यात वापरली जाणारी भाषा

मटक्यात 0 ते 9 अशा दहा आकड्यांमधला एक अंक पहिल्या वेळेस येतो त्याला ओपन/Open म्हणतात.आणि पुन्हा दीड ते दोन तासाने शून्य ते नऊ यातला एक आकडा पुन्हा येतो त्याला क्लोज/Close म्हणतात.दोन्ही आकडे आल्यावर जोड/जॉइंट तयार होते.जोडीला एक रुपयाला 90 रु.भाव असतो.ओपन किंवा क्लोज या पैकी कुठल्याही सिंगल आकड्याला 1 रुपयाला नऊ रुपये भाव असतो.0 ते 9 या प्रत्येक अंकाला 22 पान्हे आहे. एकूण 220 पान्हा/पत्ती असते.

पान्हा/पत्ती

पान्हा हा तीन आकडी संख्या आहे,लहान अंक संख्या ते मोठी अंक या क्रमात लागलेला असतो उदा.149 =14 शेवटचा अंक चार आहे म्हणजे चउक/चौका,127 =10 म्हणजे झीरो/मेंढी/दस्सा.

9 number matka pana



9 नव्वा चे पूर्ण 22 पाना/पत्ते

वरील प्रमाणे 0 ते 9 अंकांचे दोनशे वीस पाने/पत्ते असतात.ज्या पानांमध्ये एक अंक दोन वेळेस आलेला दिसतोय तसे प्रत्येक अंकांना 10 पान्हे असतात त्यांना मेट्रो/डबल पान्हा म्हणतात,त्याला 1 रुपयाला 320 रु. भाव मिळतो.आणि उर्वरित बारा पान्हे जे साधे आहे त्यांना रुपयाला 160 रु भाव राहतो.वेगवेगळ्या ठिकाणी कमी जास्त भाव असू शकतो.

जॅकपॉट-चार अंकी खेळ

ओपन किंवा क्लोज मधील एक पान्हा आणि आणि एक आकडा मिळून जॅकपॉट खेळला जातो.जसे तुम्ही गेस काढला आज 93 जोड होऊ शकते.त्याचा जॅकपॉट खेळायचा असेल तर वरील 22 पान्हा पैकी येऊ शकतो असा एखादा पान्हा निवडायचा(कितीही पान्हे घेता येतात)उदा.568 त्याच्या पुढे 3 अंक लावावा लागतो आणि 3 च्या पुढे तुम्हाला जेव्हढी रक्कम लावायची आहे तो आकडा येतो.समजा तुम्ही दहा रुपयांचा जॅकपॉट लावणार असेल तर ते 568×3×10 या पद्धतीने लिहले जाते,तुम्ही उलटे सुद्धा खेळू शकतात जसे 9×120×10 जॅकपॉटला रुपयाला 900 ते 1500 भाव असू शकतो.

संगम - सहा अंकी खेळ

संगम मध्ये दोनही बाजूचे पान्हे लिहून द्यावे लागतात उदा.568×120×रक्कम ते जश्याच तसे आल्यास एक रुपयाला नऊ ते पंधरा हजार भाव मिळतो.

चौकडा - दोन जोड्यांचा खेळ

चौकडा एकाच बाजारासाठी किंवा दोन वेगवेगळ्या बाजारासाठी खेळता येतो.ऊदा. आजची आणि उद्याची कल्याण जोड किंवा दुपारच्या महाराष्ट्र डे व रात्रीच्या महाराष्ट नाइट ला लिहून दिलेल्या जोड्या पास झाल्या पाहिजे.चौकड्याला प्रति रुपया जॅकपॉट एव्हडाच भाव मिळतो.यात छकडम नावाचा आणखी एक प्रकार आहे ज्यात तीन जोड्या लिहून द्याव्या लागतात ज्याला खूप जास्त भाव मिळतो पण सहसा कुणी हे दोन्ही प्रकार खेळत नाही.कारण मटक्यात एकाच अंकाची शास्वती नसते तेव्हा चार /सहा आकडे कोण खेळणार,नाही का?

लाल घर काय असते?,open close च्या वेळेत अंतर का?

साधारणतः ओपन आणि क्लोजच्या वेळापत्रकात वेगवेगळ्या बाजारांनुसार 2 ते तीन तासांचा गॅप असतो.सुट्टे आकडे म्हणजे सिंगल क्लोज अंक किंवा पान्हे/पत्ते लोकांना खेळता यावे यासाठी हा वेळ दिल्या जातो.त्याचे दुसरे एक कारण असेही आहे जर तुम्ही ओपन मध्ये हरला असाल किंवा तुमचे आकडे फेल झाले असेल तर तुम्ही क्लोज खेळून तुमचे पैसे परत मिळविण्याची संधी तुम्हाला दिली जाते.

लाल घर मटक्यात कशाला म्हणतात

मटक्यात 0 ते 9 या प्रत्येक अंकाचे एक कट घर मानले जाते. 0 चे 5(पंजा)9 चे 4,एक्का(1)चे 6 असे पाच अंक वाढवून आलेले आकडे त्या त्या घराचे कट घर असते.

05 00 50 55,11 16 61 66 असे आकडे हे लाल घर म्हंटले जातात.लाल घर होण्याचे प्रमाण कमी असते.खेळणारेही लाल घर जोड्या खेळण्याचे टाळतात.

या खेळाची एक मजेशीर बाजू म्हणजे छोटीतली छोटी रक्कम लावलेल्या लोकांना सुद्धा ओपन गुंतल्यावर त्यांनी खेळलेली जोड व्हावी असे वाटत असते आणि अशात जोड लागली नाही तर खूप हुरहूर लागते.मग "ओपन में अटका क्लोज में सटका" असे म्हणायची वेळ येते.रात्री जेवायच्या वेळेवर ओपन येतो,आपला आकडा येईल का,या चिंतेने दोन घास कमीच जातात आणि ओपन गुंतला तर क्लोज काय होईल या भीतीने झोप लागत नाही."ओपन खाऊ देत नाही,क्लोज झोपू देत नाही."

मटक्यात आज पर्यन्त किती लोकांनी मोठया रक्कमा जिंकल्या आहे आणि किती लोक हा खेळ खेळून भिकेस लागले याचा कुठेही हिशोब नाही पण खेळवणारे व मटका कसा काढायचा हे शिकवणारे मात्र नक्की पैैसेे कमवत आहे व कमवूूून बसले आहे.