डिसेंबर महिना आला म्हणजे जगभरात तयारी सुरू होते ख्रिसमस या जगातील सर्वात मोठ्या सणाची,नविन वर्षाच्या स्वागताची.या कालावधीत जगभरातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली मोठी शहरे विविध प्रकारच्या रंगीबेरंगी प्रकाश योजना आणि मनमोहक आतिषबाजीने उजळून निघतात.नविनवर्षं पूर्वसंध्या साजरी करण्यासाठी ओळख असलेल्या ठिकानातील रिसॉर्टस,समुद्र किनारे व छोटे मोठे हॉटेल्स पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज होतात.आपल्या कडे जसे दसरा-दिवाळीमध्ये बाजारपेठेत,कपड्यांच्या दुकानांमध्ये गर्दी असते तसेच काहीसे चित्र ख्रिश्चन देशांमध्ये असते.घरांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य,शोभेच्या वस्तू,भेटवस्तू आणि माणसांनी बाजारपेठा व रस्ते खचाखच भरलेल्या असतात.
नवीन वर्ष 1 जानेवारीला का सुरू होते?
नविनवर्षं हे जानेवारी महिन्यात सुरू झाले पाहिजे यामध्ये कुठलेही 'खगोलीय'कारण नाही.हे सर्वसामान्यपणे मान्यताप्राप्त होत गेलेले समायोजन आहे.
भारताप्रमाणे युरोप-अमेरिकेत भरमसाठ सण,उत्सव आणि त्यामुळे मिळणाऱ्या सुट्या फारच कमी असल्यामुळे,ख्रिसमस मध्ये आलेल्या सुट्ट्यात नविनवर्षं साजरे करण्यास तिकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे.या संकल्पनेतूनच बहुदा इ.स. एकोनाविसशे(तारखेत अनेक मत आहे)पासून नववर्ष पूर्वसंध्या खानपान,नाचगाणी,मौजमजा करत जल्लोषात साजरी करण्याचा पायंडा पडला असावा.आणि हळूहळू संपूर्ण जगात न्यू इअर इव/थर्टी फर्स्ट म्हणून ओळखला जाऊ लागला.
गेल्या काही वर्षांत भारतातील तरुणाई पाश्चात्य देशातील वाईट गोष्टींचे अनुकरण करतांना दिसत आहे.न्यू इअर स्वागताच्या जल्लोषात मेट्रो सिटीतील बेभान झालेले तरुण-तरुणी अमली पदार्थ घेतांना रेव्ह पार्टी किंवा अशा काही गुन्ह्यात पकडले जातात की त्यांच्या वर्षाचा पहिला दिवस कोठडीत उगवतो.कुठलाही उत्सव-सण साजरा करण्यामागचे कारण त्यातून आनंद मिळविणे असतो.आणि तो कसा प्राप्त करायचा हे सर्वतोपरी आपल्यावर अवलंबून असते.आधुनिकतेचे वारे लागलेल्यांना याचा विसर पडत आहे.
भारतात या काळात सुट्ट्या नसतात.तरी काही हौशी आपल्या ठेवणीतल्या रजा काढून मित्रमंडळी किंवा परिवारासोबत येणाऱ्या वर्षाच्या स्वागतासाठी नियोजित स्थळी दाखल होतात.गोवा हे भारतीय आणि विदेशी पर्यटकांसाठी आवडते डेस्टिनेशन आहे.तसेच अंदमान निकोबार,शिलॉंग,शिमला,उदयपूर,केरळ,उटी,गंगटोक,लक्षद्वीप इत्यादी ठिकाणांना पर्यटकांची पसंती असते.भारतातील मोठ्या शहरांमध्ये बॉलिवूड स्टार्स,संगीत क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करून लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात येते.31 डिसेंम्बर परिवारासोबत साजरी करणाऱ्यांची गर्दी रेस्टॉरंट व मनोरंजन पार्क येथे बघायला मिळते.बरेचजण घरी थांबण्यातच आनंद मानतात.घरी थांबून सोशल मीडियावरून मित्र,आप्तेष्टांना शुभेच्छा देतात.नवीन वर्षाकडून आपल्या सर्वांनाच बऱ्याच अपेक्षा असतात.प्रत्येकांनी आपल्या स्वतःसाठी काहितरी संकल्प केलेला असतो.मित्र,परिवारासाठी कुठल्या नि कुठल्यातरी आगामी योजना आखलेल्या असतात.ह्या संकल्प,योजना पूर्ण करण्यासाठी तसेच गत वर्षीच्या चुकांची पुनरावृत्ती नहोवो यासाठी प्रयत्न करत राहणे,नव वर्ष साजरे करण्याची अशी एक पद्धत पाहायला मिळते.
Updated